नाशिक: जिममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

अजिंक्य लोळगे असे मृत युवकाचे नाव असून तो इंजिनियरिंगचा विद्यार्थी होता. उत्तमनगर परिसरातील बॉडी झोन जिममध्ये शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता अजिंक्य व्यायाम करण्यासाठी गेला होता.

नाशिक - जिममध्ये व्यायाम करताना एका 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकच्या उत्तमनगर परिसरात घडली. 

अजिंक्य लोळगे असे मृत युवकाचे नाव असून तो इंजिनियरिंगचा विद्यार्थी होता. उत्तमनगर परिसरातील बॉडी झोन जिममध्ये शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता अजिंक्य व्यायाम करण्यासाठी गेला होता. व्यायाम करत असताना अचानक चक्कर आल्याने अजिंक्य जागीच कोसळला. 

दरम्यान त्याला जवळच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण उपचार सुरू होण्यापूर्वीच अजिंक्यचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. अजिंक्यने तीन दिवसांपूर्वीच जिम जॉईन केली होती. एकुलता एक मुलगा गमावल्यानं आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स