नाशिक: गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना ड्रेसचे वाटप

दिगंबर पाटोळे
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

खंडेराव नगर बाल गणेश मंडळ हे गेल्या पाच वर्षांपासून स्व इच्छेने मिळालेल्या वर्गणीतून गणेश मंडळाची स्थापना करीत आतापर्यंत गणेशोत्सवात वृक्षारोपन करुन सर्व झाडांचे यशस्वीपणे संवर्धन केले आहे. त्याचबरोबर विविध सामान्यज्ञान, कला क्रीडा स्पर्धा सारखे विधायक उपक्रम राबविले आहे. मागील वर्षी मंडळाने शिल्लक राहीलेली २ हजार १०० रुपयांची वर्गणीचा धनादेश दुष्काळ ग्रस्तांसाठी मुख्यमंत्री निधीत तहसिलदारांकडे सुपुर्त केला होता.

वणी : येथील खंडेराव नगरातील बालगणेश मंडळाच्या चिमुकल्यांनी गणेशेत्सवातील खर्चात काटकसर करुन उरलेल्या वर्गणीमधून येथील आधार आश्रमातील मुलांना नवीन कपडे देवून त्यांच्या सोबत स्नेहभोजन करुन गणपती बाप्पांची मूर्ती नदीपात्रात विसर्जीत न करता दान करीत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

येथील खंडेराव नगरातील सुमारे साठ चिमुकल्यांनी खाऊसाठी मिळालेले पैशे गल्ल्यात साठवून त्यातील काही चिमुकल्यांनी पन्नास तर काहींनी शंभर रुपये गणेशोत्सवासाठी वर्गणी दिली. संकलीत झालेल्या वर्गणीतून बाळगोपाळांनी नगरातील सार्वजनिक ठिकाणी घरगुती सजावट करुन शाडूमातीच्या गणपतीची स्थापना केली. यासाठी पालकांनी काही प्रमाणात मदत केली. दरम्याण गणेशोत्सवात दररोज वेगवेगळ्या विषयांवर निंबध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संगित खुर्ची, लिंबु चमचा, रांगोळी, प्रश्न मंजुषा, सामान्य ज्ञान आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वर्गणीतील पैशांतून  स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकाने विजेत्या झाल्यांना मोठे बक्षीस तर स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना छोटे बक्षीसे वाटण्यात आली. दरम्यान गणेशोत्सवातील सर्व खर्च वजा जाता शिल्लक राहीलेली वर्गणीतील रक्कम मिरवणूक व अनावश्यक ठिकाणी न करता बालगोपाळांनी पालकांच्या मदतीने येथील वात्सल्य अनाथालयातील मुलांना खर्च करण्याचा निर्णय घेत आश्रमातील वयाने आपल्या एवढ्याच नऊ बालकांना नवीन कपडे घेतली.

आज गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी बाल गणेश मंडळाच्या सदस्यांनी अनाथालयातील विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देत स्वागत करीत नवीन ड्रेसचे वाटप केले. यावेळी झालेला कार्यक्रमाचे प्रास्तविक पालक प्रदीप शेगर तर मनोगत संजीव जुन्नरे यांनी मानले. आश्रमाच्या व्यवस्थापीका कौशल्या पवार यांनी बाल गोपाळाच्या उपक्रमाचे कौतूक करुन पालक वर्गाचे आभार मानले. यावेळी मंडळातील बाल सदस्यांनी आपआपल्या घरुन जेवनाचा डबा घेवून येवून आश्रमातील मुलांसोबत एकत्रीतरीत्या स्नेहभोजनाचा आनंद लुटला. यानंतर गणपती बाप्पांची पुजा विधी करुन खंडेराव नगरातच मंगलमूर्ती मोऱर्या, गणपती बाप्पा मोरर्या.. पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करीत गणेश मुर्तीची मिरवणूक काढली. यावेळी मूर्ती नदीत विसर्जीत न करता दान देवून बाल मंडळाने समाजापुढे आदर्श निर्माण केला असून बाल गणेश मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

खंडेराव नगर बाल गणेश मंडळ हे गेल्या पाच वर्षांपासून स्व इच्छेने मिळालेल्या वर्गणीतून गणेश मंडळाची स्थापना करीत आतापर्यंत गणेशोत्सवात वृक्षारोपन करुन सर्व झाडांचे यशस्वीपणे संवर्धन केले आहे. त्याचबरोबर विविध सामान्यज्ञान, कला क्रीडा स्पर्धा सारखे विधायक उपक्रम राबविले आहे. मागील वर्षी मंडळाने शिल्लक राहीलेली २ हजार १०० रुपयांची वर्गणीचा धनादेश दुष्काळ ग्रस्तांसाठी मुख्यमंत्री निधीत तहसिलदारांकडे सुपुर्त केला होता.

Web Title: Nashik news ganesh mandal help children