‘राग देश’ चित्रपट २८ ला रूपेरी पडद्यावर

‘राग देश’ चित्रपट  २८ ला रूपेरी पडद्यावर

राष्ट्रपती भवनात प्रीमियरसाठी नाशिकमधील मायलेकींची उपस्थिती

नाशिक - ‘लाल किले से आई आवाज, ढिल्लन-सहगल-शाहनवाज’, ‘लाल किला तोड दो, ढिल्लन-सहगल-शाहनवाज को छोड दो!’ १९४५ मध्ये गल्लोगल्ली उठलेल्या या आवाजाने लाल किल्ल्याच्या भिंती हलवल्या होत्या. हाच आवाज ‘पानसिंह तोमर’चे दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘राग देश’ चित्रपटातून दुमदुमणार आहे. हा चित्रपट २८ जुलैला प्रदर्शित होत आहे. राष्ट्रपती भवनात झालेल्या चित्रपटाच्या प्रीमियर शोसाठी नाशिकमधील आशिता आणि पूर्णिमा ढिल्लन या मायलेकी उपस्थित होत्या.

राज्यसभा दूरचित्रवाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एस. सप्पाल चित्रपटाचे निर्माते आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ‘आझाद हिंद सेना’मधील कमांडर कर्नल गुरबख्श सिंह ढिल्लन, कर्नल प्रेमकुमार सहगल आणि जनरल शाहनवाज खान यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित चित्रपटाचे कथानक आहे. या तिघांच्या त्यागाप्रमाणेच अतुलनीय कामगिरीने ब्रिटिशांना हादरे दिले आहेत. चित्रपटात शाहनवाज खान यांची भूमिका कुणाल कपूरने, कर्नल ढिल्लन यांची भूमिका अमित सादने, तर सहगल यांची भूमिका मोहित मारवाने केली. कर्नल ढिल्लन यांच्या स्नुषा पूर्णिमा ढिल्लन या कन्या आशिता आणि नातवंडांसह नाशिकमध्ये गंगापूर रोडवर राहतात. राष्ट्रपती भवनातील प्रीमियर शोसाठी तीनही भूमिपुत्रांच्या कुटुंबीयांना निमंत्रित करण्यात आले होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, मंत्री आणि राजकीय नेते उपस्थित होते.

राष्ट्रपती भवनातील या सोहळ्यानंतर परतल्यावर मायलेकींनी चित्रपटाविषयीची माहिती ‘सकाळ’ला दिली. ढिल्लन कुटुंबीय मूळचे मध्य प्रदेशातील आहे. मुलांचे शिक्षण आणि नोकरीच्यानिमित्ताने आशिता ढिल्लन नाशिकमध्ये आल्या. त्यांच्यासमवेत त्यांच्या आई राहतात.
सत्तर वर्षांनंतर...

चित्रपटाच्या माध्यमातून ७० वर्षांनंतर देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाची पाने तिग्मांशू यांनी प्रकाशझोतात आणली आहेत, असे सांगून पूर्णिमा म्हणाल्या, की आजच्या तरुण पिढीला आणि भावी पिढीला हा चित्रपट मार्गदर्शक ठरणार आहे. देशप्रेमाचे अंकुर चित्रपटाद्वारे फुलण्यास मदत होणार आहे. ब्रिटिशांनी १९४५ मध्ये लाल किल्ल्यात कर्नल ढिल्लन, कर्नल सहगल आणि जनरल शाहनवाज यांना ठेवत त्यांना फासावर लटकवण्याची शिक्षा सुनावली होती. त्या वेळी ‘लाल किले से आई आवाज, ढिल्लन-सहगल-शाहनवाज’, ‘लाल किला तोड दो, ढिल्लन-सहगल-शाहनवाज को छोड दो!’ ही प्रतिक्रिया उमटली होती. त्यानंतर ब्रिटिशांना तिघांची फाशी रद्द करावी लागली होती. तेजबहादूर सप्रू, कैलाशनाथ काटजू, भूलाभाई देसाई अशा दिग्गज वकील आणि जनतेच्या रेट्यापुढे ब्रिटिशांना हार मानावी लागली. लाल किल्ल्यातील हा दावा ऐतिहासिक बनला. त्यामुळे कर्नल ढिल्लन यांची मोठी स्नुषा म्हणून तिग्मांशू यांना धन्यवाद द्यायला हवेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com