राज्य शिक्षण मंडळाने बदलला निर्णय, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची पाऊले पुन्हा बोर्डाकडे !

cbse
cbse
Updated on

नागपूर : शैक्षणिक धोरण नेहमीच बदलत असते. परिणामी विद्यार्थी आणि पालकांचा शैक्षणिक निर्णय घेताना कायम गोंधळ उडत असतो. यंदाही काहीसे असेच झाले आहे.
राज्य शिक्षण मंडळाने गेल्यावर्षी बारावीमध्ये अंतर्गत मूल्यमापनाचे वीस गुण काढून घेण्याचे ठरविले होते. त्यामुळे सीबीएसई दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी गेल्यावर्षी राज्य शिक्षण मंडळाकडे पाठ फिरवित अकरावीमध्येही सीबीएसईमध्येच प्रवेश घेतले होते. मात्र, राज्य शिक्षण मंडळाने हा निर्णय मागे घेतल्याने आता पुन्हा एकदा सीबीएसई दहावीचे विद्यार्थी बोर्डाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची शक्‍यता आहे.

गेल्यावर्षी राज्य शिक्षण मंडळाने बारावीमध्ये अंतर्गत मूल्यमापनाचे वीस गुण काढून घेण्याचे ठरविले होते. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी गेल्यावर्षी सीबीएसई शाळेत प्रवेश घेतले. याचा फटका राज्य शिक्षण मंडळाला बसला होता.

दुसरीकडे आंतरिक गुण बंद केल्याने पालकांनी रोष व्यक्त करीत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. विशेष म्हणजे याचवेळी सीबीएसईद्वारे गणित, इंग्रजी आणि हिंदीसारख्या विषयात अंतर्गत मूल्यमापन करुन गुणदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार केमेस्ट्री, फिजिक्‍स, बायोलॉजीप्रमाणंच इंग्रजी आणि हिंदीमध्ये स्पीकिंग नॉलेज आणि गणितामध्ये प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे याचा फायदा लक्षात घेत, पालकांनीही याबद्दल विचार बदलला असून राज्य शिक्षण मंडळाकडे पाठ फिरवित पाल्यांना सीबीएसईमध्येच प्रवेश दिला होता. त्यामुळे जवळपास सीबीएसईची बहुतांश महाविद्यालये हाऊसफुल्ल झाली होती.

सविस्तर वाचा - नागपूर शहरात तब्बल 173 जीर्ण इमारती! हजारावर नागरिकांचा जीव धोक्‍यात

मात्र, राज्य बोर्डाने लगेच बारावीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा आंतरिक गुण देण्याचा निर्णय घेतला. त्याचाच परिणाम म्हणून राज्य मंडळाच्या बारावीच्या निकालात यावर्षी कधी नव्हे ते 9.14 टक्‍क्‍यांची वाढ झाली. शिवाय 90 टक्‍याहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. विशेष म्हणजे यावर्षी नव्या अभ्यासक्रमाचे तिसरे वर्ष असल्याने आता त्याविषयीची भीतीही विद्यार्थ्यांच्या मनातून निघाली आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी यावेळी राज्य मंडळाशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणार असल्याचे दिसून येते.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com