तांत्रिक गोंधळात ऑनलाईन परीक्षेचा शुभारंभ, विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

file photo
file photo

नागपूर  ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गुरुवारपासून सुरू झालेल्या अंतिम सत्राच्या ऑनलाइन परीक्षांमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना बऱ्याच तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. लॉगीन केल्यावर मोबोईलवर येणारा ‘ओटीपी‘ विद्यार्थ्यांना मिळालाच नसल्याने बरेच विद्यार्थी परीक्षेला मुकल्याचे दिसून आले. परीक्षेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात अनेक विद्यार्थ्यांचे पेपरच अपलोड झाले नसल्याची तक्रार समोर आली.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर विद्यापीठाने परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली. प्रथम १ ऑक्टोबरपासून परीक्षा घेण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, अचानक विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकांनी आंदोलनाचे अस्त्र उगारल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. मंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर ८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान परीक्षा घेण्याचे ठरले. त्यानुसार गुरूवारी (ता.८) सकाळी साडेनऊ ते साडेचारदरम्यान चार टप्प्यात २२ विषयांचे पेपर घेण्यात आले.

मात्र, अगदी पहिल्या पेपरपासूनच विद्यार्थ्यांना ओटीपी मिळत नसल्याची तक्रार समोर आली. यामुळे विद्यापीठाचे हेल्पलाईनचे फोन सारखे खणखणत होते. पहिल्या टप्प्यात ही समस्या दूर होताच, दुसऱ्या टप्प्यातील पेपर सुरळीत झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील बीएस.स्सी मायक्रोबायोलॉजी, सांख्यीकी, रसायनशास्त्र आणि एम.एस.स्सीच्या पेपरमध्ये बऱ्याच तांत्रिक अडचणी दिसून आल्यात. शिवाय चौथ्या टप्प्यातील काही पेपरमध्येही तांत्रिक समस्या दिसून आल्यात. यामुळे विद्यार्थ्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला. अनेक विद्यार्थी वंचित राहील्याचे दिसून आले.

ओटीपी ची समस्या मिटणार
ओटीपीमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. एकाच वेळी शेकडो विद्यार्थ्यांनी ओटीपी डाऊनलोड केल्याने सर्व्हरवर ताण आल्याने यंत्रणा फिस्कटली. यामुळे उद्या होणाऱ्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना एकच ओटीपी देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. ही समस्या सुटल्यास परीक्षा सुरळीत पार पडेल असा विद्यापीठाचा दावा आहे.

३१६ विद्यार्थी वंचित
परीक्षेच्या तांत्रिक घोळात तिसऱ्या टप्प्यातील बीएस.स्सी अभ्यासक्रमातील परीक्षांमध्ये एकून १ हजार ४८४ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३१६ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहील्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सागितले. यात मायक्रो बायोलॉजीचे २४९ तर सांख्यीकीचे ४७ विद्यार्थी आहेत.

"झिरो अटेंडंन्स" सह बऱ्याच तक्रारी
परीक्षेचा पहिला दिवस होता. तीन सत्रे योग्यरित्या घेण्यात आली. ओटीपीला उशीर झाल्यावर आणि अ‍ॅप योग्यरित्या उघडला जात नाही आणि प्रश्न निराकरण झाल्यानंतरही, "झिरो अटेंडंन्स" सह बऱ्याच तक्रारी आहेत. ज्यांना परीक्षा देता आली नाही, त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. त्यांच्या परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफ लाईन घेण्यात येईल.ज्यांनी पेपर सोडविले पण त्यांचे पेपर सबमिट झालेच अशा काहींच्या तक्रारी आहेत. मात्र सोडविलेले प्रश्न सर्व्हरमध्ये नोंदवले गेले आहेत.

डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com