तंत्रज्ञानाची कमाल! आता कोरोनावर वॉच ठेवणार कॅमेरा

camera
camera

नागपूर : अभियांत्रिकीच्या दोन युवकांनी आर्टिफिशल इंटेलिजन्सचा उपयोग करून 'कोविड सेफ्टी किट' नावाने कॅमेरा तयार केला आहे. या कॅमेऱ्याद्वारे नागरिकांनी मास्क घातला आहे का आणि त्यांचे टेम्परेचर किती आहे याची तपासणी करणे शक्य पोणार आहे.

सुमारे महिनाभर टाळेबंदी केल्यानंतर व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे बघून राज्य सरकारने "अनलॉक' ची प्रक्रिया सुरू केली. त्यानुसार राज्यात कोविड-१९ च्या विविध अटीचे पालन करून दुकाने व मॉल सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामध्ये मास्क घालणे तसेच दुकान व कार्यालयात जाताना नागरिकांचे बॉडी टेम्परेचर मोजणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे दुकान व कार्यालयाबाहेर गार्डच्या हातात थर्मल स्कॅनर देत, त्यांच्याकडून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे तापमान मोजले जाते. मात्र, अनेकदा मॉल आणि कार्यालयात मास्कशिवायही नागरिक ये-जा करीत असतात. त्यामुळे कोरोना संक्रमणाची दाट शक्यता असते. ही समस्या लक्षात घेत, वीर मिश्रा आणि विवेक सिंग या दोन युवकांनी 'कोविड सेफ्टी किट' तयार केली. यात आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञान, सीसीटीव्ही कॅमेरा आणि टीव्हीचा उपयोग करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा - आता तीन वर्षांच्या आत होणार व्यंगत्वाचे निदान

संक्रमणाचा धोका कमी होणार
मॉल आणि मोठ्या दुकानात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येते. या प्रकाराने कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता अधिक असते. या कॅमेराच्या मदतीने व्यक्तीचे तापमान मोजले जाणार असल्याने त्याला दुकानात येण्यास मज्जाव करण्यात येणार आहे, त्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होण्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.

 
संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com