प्राध्यापकांसाठी कोण ठरताहेयं झारीतील शुक्राचार्य ?

who is the shukracharya among the professors ?
who is the shukracharya among the professors ?
Updated on

नागपूर : महाविद्यालयातील प्राध्यापक भरती बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी अंशकालीन प्राध्यापकांची नेमणूक केली जात आहे. या प्राध्यापकांच्या अध्यापनाचे देयके उच्च शिक्षण विभागाला महाविद्यालयाने पाठविणे सक्तीचे आहे. मात्र, बाबूनी अद्यापही देयके न पाठविल्याने वेतन थकले असून झरीतील शुक्राचार्य कोण ? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

शैक्षणिक वर्षामध्ये जुलै ते मार्च दरम्यान दरवर्षी अंशकालीन प्राध्यापकांची विविध महाविद्यालयात अध्यापनासाठी नेमणूक केली जाते. दिवाळीतील विद्यापीठाची सुटी वगळता जुलै ते मार्च वर्षअखेर अंशकालीन प्राध्यापकांच्या अध्यापनाची देयके उच्च शिक्षण विभागाला महाविद्यायाने पाठवणे अनिवार्य असते. प्राध्यापकांनी बाबूंना देयक दिल्यानंतर महिनोंमहिने महाविद्यालयात धूळखात असल्याने प्राध्यापकांना वेतनापासून वंचित आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून राज्यात प्राध्यापकांची भरती करण्यात आली नसल्याने बऱ्याच विषयांमध्ये अंशकालीन प्राध्यापकांची नेमणूक करण्यात येते. राज्यात दरवर्षी 12 हजारावर अंशकालीन प्राध्यापकांची नेमणूक करण्यात येते. मात्र, दरवर्षी या प्राध्यापकांच्या पगाराच्या प्रश्‍न निर्माण होतो. विशेष म्हणजे उच्च शिक्षण विभागात दर तीन महिन्याला अनुदान प्राप्त होते.त्या कालावधीत महाविद्यालयातून तत्परता दाखवल्या गेल्यास चार महिन्यात अंशकालीन प्राध्यापकाला पगार मिळतो. असे वर्षातून चारवेळा अनुदान मिळते. हे अनुदान मिळूनही वर्षभर महाविद्यालयातील बाबू सहसंचालक कार्यालयात देयके पाठवित नसल्याचे चित्र आहे. या प्रकाराने एकाही महिन्याचा पगार न मिळणारे हे अंशकालीन प्राध्यापक आपला उदरनिर्वाह कसा करीत असेल हा प्रश्नच आहे.

इतकेच नव्हे तर शैक्षणिक वर्षअखेर महाविद्यालयाला देयक सादर करूनही केवळ बाबूगीरीमुळे हे पगार दोन वर्ष झालेतरी अद्यापही मिळाले नाहीत.
दुसरीकडे आज कोरोनामुळे महाविद्यालये बंद आहेत. विद्यापीठे व महाविद्यालयांमधील बरीच पदे रिक्त असताना 2006 पासून महाराष्ट्र शासनाची प्राध्यापक भरती बंद आहे. याप्रकाराने अंशकालीन प्राध्यापक हवालदील झाले आहे.


अनुदान जाते परत
उच्च शिक्षण विभागात दर तीन महिन्याला अनुदान प्राप्त होते.त्या कालावधीत महाविद्यालयातून तत्परता दाखवल्या गेल्यास चार महिन्यात अंशकालीन प्राध्यापकाला पगार मिळतो. असे वर्षातून चारवेळा अनुदान देऊनही महाविद्यालये त्याच वर्षी देयक सादर करण्यात येत नसल्यास ते अनुदान सरकारला परत जाते.
 

बाबुगिरीला बसावा चाप
शैक्षणिक वर्षअखेर महाविद्यालयाला देयक सादर करूनही केवळ बाबूगीरीमुळे हे पगार दोन वर्ष झाले तरी अद्यापही मिळाले नाहीत. याला जबाबदार फक्त बाबूगीरीच जहाहदार असल्याने त्यावर चाप बसावा अशी मागणी डॉ. प्रमोद लेंडे यांनी केली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com