अकोला: स्वातंत्र्य दिनानिमित्त चित्तथरारक 'तिरंगी एअर शो'

योगेश फरपट
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

१५ आॅगस्ट रोजी क्रिकेट क्लब मैदानावर सकाळी ९.३० ते ११ वाजेपर्यंत या ‘एअर शो’चा आनंद अकोलेकरांना लुटला. रिमोटवर चालणाऱ्या 10 ते 12 वेगवेगळ्या प्रकारच्या विमानाचे प्रात्यक्षिक झाले. यामध्ये एरोबेटिक, अक्रोबेटीक, आइर फ्लाय, कलर ट्रायचा समावेश होता. 

अकोला : नॅशनल इंट्रिग्रिटी मिशन व वंदेमातरम संघटनेच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत अकोलेकरांसाठी ‘तिरंगी एअर शो’चे आयोजन केले होते. 

१५ आॅगस्ट रोजी क्रिकेट क्लब मैदानावर सकाळी ९.३० ते ११ वाजेपर्यंत या ‘एअर शो’चा आनंद अकोलेकरांना लुटला. रिमोटवर चालणाऱ्या 10 ते 12 वेगवेगळ्या प्रकारच्या विमानाचे प्रात्यक्षिक झाले. यामध्ये एरोबेटिक, अक्रोबेटीक, आइर फ्लाय, कलर ट्रायचा समावेश होता. 

उमेश मसने, प्रा.डॉ.संतोष हुशे आणि त्यांची चमू दरवर्षी स्वातंत्र्य दिनाचे आैचित्य साधून विविध देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. त्यांच्या आयोजनातून अकोेलेकरांना दरवर्षी आगळेवेगळे प्रयोग अनुभवता येतो. विश्‍वविक्रमी १०५ फुट उंचीचा माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे तैलचित्र, २१० फूट लांबीचा केक, तीन किलोमीटर लांबीचा तिरंगा, हत्ती-घोड्यांची जल्लोष यात्रा, ४०० क्रांतीकारकांच्या झाँकीची रॅली, सत्यमेव जयते रॅली, कारागृहात देशभक्तीपर गितांनाच कार्यक्रम, संपूर्ण राज्याची संस्कृती व नृत्य दर्शनाची रॅली, तिरंगा पोषाखातील रॅली, असे एक ना अनेक कार्यक्रम आतापर्यंत सादर केलेत. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड ने सुद्धा या उपक्रमाची नोंद घेतली आहे. यासाठी नॅशनल इंट्रीग्रिटी मिशन, वंदेमातरम संघटना, हुशेबंधू ज्वेलर्स, गुजराती नवरात्री उत्सव समितीचे सहकार्य लाभते.

Web Title: Akola news air show in akola