देशाचा राजा कायम, दुष्काळी परिस्थिती नसण्याचा घटमांडणीचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

भेंडवळ (बुलडाणा) - जेव्हा हवामान खाते किंवा पाऊस पाण्याविषयी माहिती देणारी कुठलीही सुविधा उपलब्ध नसतांना बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळमधील वाघ वंशाचे पुर्वज चंद्रभान महाराज यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरलेल्या भेंडवळ घटमांडणीची सुरूवात केली. आणि ती परंपरा या वाघ कुटुंबियाने गेल्या साडेतिनशेवर्षांपासून   आजही जपली आहे. विधिवत पूजन करून ही घटमांडणी केली जाते. शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष वेधणारी बहूचर्चीत भेंडवळची घटमांडणी  अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बुधवारी (ता.18) सायंकाळी करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी सुर्योदयी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज वाघ यांनी अंदाज व्यक्त केले.

''या हंगामात पिक आणि पाऊस समाधान कारक राहील. देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान कायम राहणार असून, दुष्काळी परिस्थिती फारशी उदभवणार नाही, असे अंदाज भेंडवळच्या घटमांडणीने दिले'.

अक्षयतृतीयेला संध्याकाळी पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज आपल्या अनुयायांसह चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत गावाशेजारील शेतात घटमांडणी केली होती. गोल घट करून घटाच्या मधोमध खड्डा करण्यात आला. यामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्याचे प्रतिक म्हणून चार मातीची ढेकळे व त्यावर घागर ठेवण्यात आली.  या घागरीवर पापड, पुरी, सांडोळी, कुरडई, करंजी, भजं आणि वडा अशा प्रतीकात्मक खाद्य पदार्थांची मांडणी केली होती. घटात अंबाडी, गहू, ज्वारी, बाजरी, कपाशी, मटकी, मुंग, उडीद, करडी, तांदुळ, जवस, तीळ, मसुर, हरभरा, वाटाणा, भादली इत्यादी १८ प्रकारच्या धान्याची मांडणी करण्यात आली होती.. धान्य आणि खाद्य पदार्थांची पाहणी करून अंदाज व्यक्त करण्यात आले. 

येत्या हंगामात खरीपातील ज्वारी, मूग, बाजरी, जवस ही पिके व्यवस्थित येतील असे सांगण्यात आले. तर कपाशी, तूर, उडीद, तीळ, भादली, लाख, वाटाणा, ही पिके कमी अधिक प्रमाणात येतील. रब्बीत गहू, हरभरा ही पिकेही सामान्य सांगण्यात आली. पावसाचा अंदाज देताना जूनमध्ये पाऊस सुरु होणार असला तरी पेरण्या जुलै महिन्यात होतील. जूनपेक्षा जुलैमध्ये अधिक पाऊस पडेल. त्यानंतर ऑगस्टमध्ये अधिक पाऊस पडणार आहे. सप्टेंबरमध्ये साधारण पाऊस असेल. शिवाय लहरी स्वरुपातील पाऊस होईल. चार महिन्यांच्या काळात साधारण स्वरुपातील पाऊस होईल. देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान कायम राहणार असला तरी त्याला चिंता असेल. आथिर्क स्थिती मजबूर राहील. यंदा मोठी नैसर्गिक आपत्ती नसेल. देशाचे शत्रू त्रास देतील परंतु संरक्षण मजबूत असल्याने कुठलाही धोका होणार नाही. शेतमालाच्या भावात तेजीमंदीचा असे अंदाजही यावेळी मांडण्यात आले. 

या घटमांडणीचे अंदाज एकण्यासाठी हजारो शेतकरी पहाटेपासून उपस्थित होते. 

Web Title: bhendwal ghatmandani weather forecast