रासायनिक कीटकनाशकांमुळे 9 महिला शेतमजुरांना विषबाधा

विरेंद्रसिंग राजपूत
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

रामपूर येथील काही शेतमजूर महिला गावातीलच एका शेतात मका या पिकाला लागलेल्या खोड किडीच्या प्रादुर्भावाला नष्ट करण्यासाठी या सर्व महिलांनी कार्बोमाईन नावाचे कीटकनाशक मका पिकाला हाताने टाकले. कीटकनाशक टाकल्यानंतर त्या महिला दुपारी कामावरून घरी परतल्या. घरी आल्यानंतर त्यातील महिलांना मळमळ, उलटी, हातांना मुंग्या येणे, चक्कर येणे, अंधुक दिसणे सारखे लक्षणे दिसून आल्याने त्यांना प्रथम नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

नांदुरा (बुलडाणा) : मका पिकाला कीटकनाशक देऊन घरी परतलेल्या ९ महिला शेतमजुरांना 'कार्बोमाईन' नावाच्या कीटकनाशकांचा पादुर्भाव झाल्याने विषबाधा झाली. त्यांना तात्काळ प्रा. आ. केंद्र नांदुरा येथे दाखल करण्यात आले. परंतु त्यांची गंभीर अवस्था पाहता नांदुरा येथील डॉ. जैस्वाल यांनी खामगाव येथील सामान्य रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी पाठविले.

याबाबत सविस्तर असे की, तालुक्यातील रामपूर येथील काही शेतमजूर महिला गावातीलच एका शेतात मका या पिकाला लागलेल्या खोड किडीच्या प्रादुर्भावाला नष्ट करण्यासाठी या सर्व महिलांनी कार्बोमाईन नावाचे कीटकनाशक मका पिकाला हाताने टाकले. कीटकनाशक टाकल्यानंतर त्या महिला दुपारी कामावरून घरी परतल्या. घरी आल्यानंतर त्यातील महिलांना मळमळ, उलटी, हातांना मुंग्या येणे, चक्कर येणे, अंधुक दिसणे सारखे लक्षणे दिसून आल्याने त्यांना प्रथम नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु त्यांची गंभीर अवस्था पाहता त्यांना नांदुरा येथून रुग्णवाहिकेद्वारे खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

रामपूर येथील गंभीर असलेल्या ९ महिलांमध्ये ताईबाई चोपडे, मायावती दांडगे, ज्योती बेलोकार, पंचफुला दांडगे, शहनाज बी शे.हुसेन, राधाबाई लहाने, रुखमाबाई लोणकर, सईबाई कावरे व कल्पना बेलोकरचा समावेश आहे.

टॅग्स