चंद्रपूर जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार झाल्याची घटना समोर आली आहे.

मूल (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार झाल्याची घटना समोर आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जानाळा गावामधील रोपवाटिकेजवळ एक सांबर मृतावस्थेत आढळून आले आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या हद्दीतील परिसरात ही घटना घडली. अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी एस. पी. आत्राम, वनरक्षक ढोले, कावळे, वन्यजीव अभ्यासक उमेश झिरे यांनी शनिवारी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. आज (रविवार) सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर सांबरास जाळण्यात आले. यावेळी प्राणीमित्र मनोज रणदिवे, कांबळे, घोटे, बावनकुळे आदी उपस्थित होते.