चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

वाघाने नागरिकावर हल्ला करण्याची या महिन्यातील ही तालुक्यातील दुसरी घटना आहे. गावकऱ्यांनी वाघाला ठार मारण्याची मागणी वनाधिकाऱ्यांकडे केली आहे.

चंद्रपूर - जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात पद्मापूर (भूज) गावातील मधुकर टेकाम (53) यांच्यावर शौचाला गेले असताने वाघाने केलेल्या हल्ल्यात ते ठार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. मात्र 7 वाजता लोकांना याबाबतची माहिती मिळाली. गावकऱयांनी वनाधिकाऱयांना माहिती दिल्यावर एक वनरक्षक पाठवण्यात आला. मात्र जोपर्यंत अधिकारी येत नाही, तोवर मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका संतप्त गावकऱयांनी घेतली. त्यामुळे मृतदेह आज (गुरुवार) पहाटे साडेचार पर्यंत तसाच पडून राहिला. यानंतर पोलिस आणि तहसीलदार घटनास्थळी आल्याने तो ब्रम्हपुरी येथे विच्छेदनासाठी आणण्यात आला.

वाघाने नागरिकावर हल्ला करण्याची या महिन्यातील ही तालुक्यातील दुसरी घटना आहे. गावकऱ्यांनी वाघाला ठार मारण्याची मागणी वनाधिकाऱ्यांकडे केली आहे.