अविवाहीत मुलीच्या आत्महत्येवरुन चांदुर रेल्वे शहरात तणाव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

सदर घटनेचे स्वरुप पाहता शहरात काहीही अनुचित प्रकार घडू नये. या साठी जिल्ह्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी दंगा नियंत्रण पथकासह आसपासचे पोलिस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी चांदुर रेल्वे शहरात तळ ठोकून आहेत.

अमरावती - अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील एका गावातील रहिवासी अविवाहित तरुन मुलीने आत्महत्या केल्याने सदर मुलीचे आत्महत्येस दोषी असणाऱ्या आरोपीस अटक त्वरीत अटक करण्याचे मागणी केल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे.

मुलीचे नातेवाईकासह गावकऱ्यांनी पोलिस स्टेशनला घेराव घातल्याने जन आक्रोश पाहता जमावाने पोलिस वाहनांवर दगडफेक केल्याने परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला सौम्य लाठीचार्ज करावा लागला असून सद्यस्थिस्ती चांदुर रेल्वे शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

सदर घटनेचे स्वरुप पाहता शहरात काहीही अनुचित प्रकार घडू नये. या साठी जिल्ह्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी दंगा नियंत्रण पथकासह आसपासचे पोलिस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी चांदुर रेल्वे शहरात तळ ठोकून आहेत.