आणखी एक महिला स्वाइन फ्लूने दगावली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

मृत्यूचा आकडा पोहोचला 26 वर

मृत्यूचा आकडा पोहोचला 26 वर
नागपूर - दिवसेंदिवस स्वाइन फ्लूचा प्रकोप वाढत असून, रुग्णसंख्येत घट होण्याऐवजी वाढ होत आहे. दर दोन दिवसांनंतर स्वाइन फ्लूने मृत्यू होत आहे. गुरुवारी रामदासपेठेतील क्रिम्स हॉस्पिटलमध्ये 57 वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. यवतमाळ येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तिला क्रिम्समध्ये उपचारासाठी आणले. परंतु उपचाराला दाद मिळत नव्हती. व्हेंटिलेटरवर असताना ती दगावली. यामुळे स्वाइन फ्लू बाधेने मृत्यू पावलेल्यांची संख्या आता 26 वर पोहोचली आहे. याशिवाय एक महिला पुन्हा व्हेंटिलेटरवर आहे. जानेवारी ते 18 मेपर्यंत नागपूर शहरात एकूण 96 रुग्णांना लागण झाल्याचे समोर आले आहे.