मृत सफाई कामगारांच्या कुटुंबास तत्परतेने १० लाखांची मदत; सेप्टीक टँक साफ करताना झाला होता मृत्यू

manual scavenging
manual scavenging

नगर : निंबळक (ता.नगर) येथे सेप्टीक टँक साफ करताना मृत्युमुखी पडलेल्या अरूण श्रीधर साठे या सफाई कामगाराचा मृत्यू झाला होता. जिल्हा दक्षता समितीच्या शिफारशीने मृत अरूण साठे यांच्या आई अंजनाबाई श्रीधर साठे यांच्या बँक खात्यात १० लाख रूपयांची मदत वर्ग करण्यात आली आहे.

manual scavenging
Sharad Pawar : श्रीकृष्णासारखे जागेवर बसुन मार्दर्शन केले तरही कलाटणी घडवण्याची ताकद; खासदार श्रीनिवास पाटील

समाज कल्याण विभागाने तत्परतेने दिलेल्या मदतीमुळे आई अंजनाबाई यांच्या डोळे पाणावले. शासनाबद्दल त्यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन अधिनियम २०१३ या कायद्याने दुषित गटारामध्ये सफाई करतांना कामगारांचा मृत्यु पावल्यास त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात येते.

manual scavenging
PM Modi News : तेव्हा बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता, आता PM मोदी…; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा दक्षता समिती मार्फत या प्रकरणांचा आढावा घेण्यात येत असतो. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त या समितीचे सदस्य सचिव असतात. त्यामुळे सफाई कामगारांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनाची जबाबदारी समाज कल्याण विभागाकडे असते.

जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या आदेशान्वये समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी मृत अरूण साठे यांच्या कुटुंबाच्या मदतीबाबत तत्परतेने कार्यवाही केली. शासनाकडून निधी प्राप्त करून घेऊन अरूणची आई अंजनाबाई साठे यांच्या वैयक्‍तिक बँक खात्यावर १० लाख रूपयांची मदत रक्कम वर्ग करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com