esakal | Video : बिबट्याचे १० महिन्याचे बछडे पिंजऱ्यात... त्यासाठी केली ‘अशी’ खेळी
sakal

बोलून बातमी शोधा

10 month old leopard in Umbribalapur in Sangamner taluka

संगमनेर तालुक्यातील उंबरीबाळापूर शिवारातील लेंडी नाला परिसरातील शेतात लावलेल्या बिंजऱ्या बिबट्याचे मादी जातीचे सुमारे 10 महिने वयाचे बछडे आज पहाटे जेरबंद झाले.

Video : बिबट्याचे १० महिन्याचे बछडे पिंजऱ्यात... त्यासाठी केली ‘अशी’ खेळी

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील उंबरीबाळापूर शिवारातील लेंडी नाला परिसरातील शेतात लावलेल्या बिंजऱ्या बिबट्याचे मादी जातीचे सुमारे 10 महिने वयाचे बछडे आज पहाटे जेरबंद झाले.

संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील आश्वी गट संगमनेर व प्रवरानगर या दोन साखर कारखान्यांच्या कॉमन झोनमध्ये य़ेत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. दक्षिणेकडील प्रवरा नदीतील वसंत बंधारा, प्रवरा उजवा कालवा व उत्तरेकडील डाव्या कालव्यामुळे या परिसरात जलसमृध्दी नांदते आहे. उसामुळे असलेले नैसर्गिक लपण, शेतावरील वस्त्यांमुळे बिबट्यांचे आवडते खाद्य असलेले कुत्रे, शेळ्या आदींसह मांजर इतर वन्यप्राणी, पिण्यासाठी पाणी या आदर्श नैसर्गिक अधिवासामुळे या प्रवरापट्ट्यात गेल्या काही वर्षात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

मानवांच्या वावराला सरावलेले हे बिबट सराईतपणे मानवीवस्तीच्या आसपास आढळतात. त्यामुळे शेतातील मशागत. जनावरांच्या चाऱ्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना, दुग्धव्यवसायीकांना रस्त्याने बिबट्यांचे दर्शन घडते. गेल्या काही वर्षातील सरावाने या परिसरातील मानवी समुह बिबट्यांबरोबरचे सहजीवन जगण्यास नकळत सरावला आहे. मात्र कधीतरी मानवावर होणाऱ्या किरकोळ हल्ल्यांमुळे काही काळासाठी दहशत निर्माण होते.

तालुक्यातील उंबरी बाळापूर शिवारात ग्रामस्थांच्या मागणीनुसार रविवार सायंकाळी कुत्र्याच्या आमिषासह लेंडीनाला परिसरात पिंजरा लावण्यात आला होता. आज पहाटे त्या पिंजऱ्यात सुमारे 10 महिने वयाचा बिबट्याचा मादी बछडा अडकला आहे. संगमनेर वनविभाग 2 चे वनक्षेत्रपाल सागर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रशांत पुंड, वनरक्षक रमेश पवार, कर्मचारी अशोक गिते व बाळासाहेब डेंगळे यांनी त्या बछड्याला निंबाळे येथील नवरोपवाटिकेत हलवले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image