राळेगण सिद्धीमधील ‘आदर्श’कडून सभासदांना 10 टक्‍के लाभांश

एकनाथ भालेकर
Tuesday, 10 November 2020

कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धी येथील आदर्श ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची मासिक सभा संस्थेच्या मुख्य कार्यालयात जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. शासनाच्या निर्देशानुसार ही सभा घेण्यात आली.

राळेगण सिद्धी (अहमदनगर) : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धी येथील आदर्श ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची मासिक सभा संस्थेच्या मुख्य कार्यालयात जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. शासनाच्या निर्देशानुसार ही सभा घेण्यात आली. 

यावेळी संस्थेच्या मागील वर्षाच्या वृत्तांताचे वाचन संस्थेचे व्यवस्थापक संजय क्षिरसागर यांनी केले. यावेळी संस्थेच्या असणाऱ्या सर्व सभासदांना 10 टक्के लाभांश देण्याचे जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी जाहीर केले. सभासदांनी पतसंस्थेत येऊन आपला लाभांश घेऊन जावा असे आवाहन संस्थेचे व्हा. चेअरमन दादा पठारे यांनी केले. 
यावेळी गंगाभाऊ मापारी, महेंद्र गायकवाड, दिलीप गव्हाणे, रामचंद्र पठारे, मनिषा गाजरे, हिराबाई पठारे, मोहन मापारी, रमेश औटी,राजाराम गाजरे, आदी संचालक उपस्थित होते. 
यावेळी मासिक सभा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनिल उगले, प्रविण कदम, बाळासाहेब पठारे, आकाश पठारे, रमेश पठारे आदींनी काम पाहिले.

जिल्हात 13 टक्के इतक्या कमी व्याजदराने कर्ज देणारी राळेगणसिद्धी येथील आदर्श ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था ही एकमेव पतसंस्था आहे. परिसरातील ज्या व्यक्तींना कर्जाची आवश्यकता आहे त्यांनी व्यक्तींनी संस्थेशी संपर्क करावा, असे आवाहन उपाध्यक्ष दादा पठारे यांनी केले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 percent dividend to members from Adarsh in Ralegan Siddhi