
कर्जत : कर्जत नगरपंचायतीला विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. आपण सर्वांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला असून सर्वांना समान न्याय दिला जाईल. महायुतीचे सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून स्वप्नातील कर्जत उभे करू, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केले.