
आमदार डॉ. किरण लहामटे यांनी बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतींना 26 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली.
अकोले : तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मोग्रस, शेरणखेल, उंचखडक खुर्द, म्हाळादेवी, मनोहरपूर, वाघापूर, निंब्रळ, चितळवेढे, निळवंडे, कळंब, बहीरवाडी अशा एकूण 11 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, 41 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे.
आमदार डॉ. किरण लहामटे यांनी बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतींना 26 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली. अकरापैकी माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील सात, आमदार डॉ. किरण लहामटे तीन, तर शिवसेनेच्या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
तालुक्यात 466 जागांसाठी 1 हजार 132 अर्ज होते. 385 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 287 जागांसाठी 568 उमेदवार रिंगणात असून, 179 उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. निवडणुकीसाठी दीड हजार कर्मचारी काम करीत आहेत.