Srirampur Crime : एकास मारहाण; १२ जणांविरुद्ध गुन्हा
सोहेल बागवान अक्षयकडे हातवारे करून शिव्या देत होता. तेव्हा त्याला शिव्या कोणाला देतो, असा जाब अक्षयने विचारले असता त्यास मारहाण करण्यात आली. गळ्यातील चैन व खिशातील पाच हजार ३०० रुपयांची रोकड काढून घेतले.
Twelve people have been booked in connection with an assault on one individual. Police investigation is ongoing.Sakal
श्रीरामपूर : बेलापूर गावात झेंडा चौकाजवळ एकाला शिवीगाळ करत चाकू दाखवून सात ते आठजणांनी मारहाण केली. तसेच गळ्यातील चैन व खिशातील पाच हजार ३०० रुपयांची रोकड काढून घेतले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.