esakal | श्रीरामपूर : यशवंत पतसंस्थेच्या सभासदांना १४ टक्के लाभांश जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीरामपूरमधील यशवंत पतसंस्थेच्या सदस्यांना 14 टक्के लाभांश जाहीर

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येथील यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना 14 टक्के लाभांश आणि सेवकांना 20 टक्के बोनस जाहीर केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष भास्कर फणसे यांनी सांगितली.

श्रीरामपूर : यशवंत पतसंस्थेच्या सभासदांना १४ टक्के लाभांश जाहीर

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येथील यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना 14 टक्के लाभांश आणि सेवकांना 20 टक्के बोनस जाहीर केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष भास्कर फणसे यांनी सांगितली. 

संस्थेच्या 30 सप्टेंबर 2020 अखेर वसुली भागभांडवल दोन कोटी 26 लाख, संचित मुदत ठेवी 79 कोटी 40 लाख, कर्ज येणे 53 कोटी, 13 लाख बँक गुंतवणूक, 29 कोटी 96 लाख असून कर्ज वसुली 94 टक्के आहेत. योग्य नियोजनामुळे संस्थेला यंदाही ऑडिट वर्ग अ मिळालेला आहेत.

यंदा सभासदांना 31-03-2020 च्या वसुल भाग भांडवलावर 14 टक्के लाभांश वाटपाचा आणि सेवकांना 20 टक्के बोनस व गणवेश देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत उपाध्यक्ष एकनाथ कोकरे, संचालक मोठ्याभाऊ दातीर, डॉ. उत्तरा पंडित, रामदास वडीतके, अंशुमन वाकचौरे, विजया शेजुळ, मीरा मिसाळ, बाळासाहेब लांडे, ॲड. सदाशिव आरगडे, व्यवस्थापक माधव निंबाळकर उपस्थित होते.


संपादन : अशोक मुरुमकर

loading image