राहुरी तालुक्यात ग्रामपंचायतीच्या ४१८ जागांसाठी १४०७ अर्ज दाखल

विलास कुलकर्णी
Wednesday, 30 December 2020

ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी बुधवारी उच्चांकी गर्दी झाली. तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले.

राहुरी (अहमदनगर) : तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी बुधवारी उच्चांकी गर्दी झाली. तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले.

सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. कोरोनाचे निर्बंध गळून पडले. 418 सदस्यांसाठी एकूण 1407 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

मंगळवारी 406 अर्ज दाखल झाले होते. राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची परवानगी दिल्याने, आज दिवसभरात तब्बल 1001 उमेदवारी अर्ज दाखल झाले. उद्या (गुरुवारी) अर्जांची छाननी होणार आहे. वैध अर्ज तहसील कार्यालयामार्फत ऑनलाइन भरले जाणार आहेत. त्यामुळे आज अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची ऑनलाईनच्या कटकटीतून सुटका झाली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1407 Candidate filed for 418 Gram Panchayat seats in Rahuri taluka