कमालचंय! दिल्ली ते मुंबई 1460 किलोमीटरचा पल्ला सायकलवर पाच दिवसांत केला पूर्ण 

अमित आवारी
Monday, 28 December 2020

दिल्ली ते मुंबई हे 1460 किलोमीटरचा पल्ला असलेले अंतर पाच दिवसांत सायकलवर जी-टू-जी सायकल राईड पूर्ण करणारे जस्मितसिंग वधवा यांचे नगरकरांतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

अहमदनगर : दिल्ली ते मुंबई हे 1460 किलोमीटरचा पल्ला असलेले अंतर पाच दिवसांत सायकलवर जी-टू-जी सायकल राईड पूर्ण करणारे जस्मितसिंग वधवा यांचे नगरकरांतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

चौका-चौकात वधवा यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. जी-टू-जी सायकल राईड नगरकरांच्या प्रेरणेने पूर्ण केल्याबद्दल शहरातून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विशाल गणेश मंदिरात दर्शन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून शहरातून स्वागत रॅली काढण्यात आली. आमदार संग्राम जगताप यांनी वधवा यांचे स्वागत केले. वधवा यांच्यासह सहा सायकपटू रॅलीत सहभागी झाले होते. 

शहरातून निघालेल्या सायकल रॅलीचा समारोप पोलिस मुख्यालयात झाला. जी-टू-जी सायकल राईड यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल पोलिस दलातर्फे जस्मितसिंग वधवा यांचा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सन्मान केला. अपर पोलिस अधीक्षक रोशन पंडित, श्रीरामपूरचे विभागीय पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस मुख्यालयाचे पोलिस निरीक्षक दशरथ हटकर, जनक आहुजा, देवेंद्रसिंह वधवा, हरजितसिंह वधवा, अतुल डागा आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल बागुल यांनी केले. धनेश खत्ती यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत मुनोत यांनी आभार मानले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The 1460 km stretch from Delhi to Mumbai was completed in five days on a bicycle