
श्रीरामपूर : शहरातील मिल्लतनगर येथे एका पत्रकारावर हल्ला करून रोख रक्कम आणि सोन्याची चेन लुटल्याची घटना घडली. सलीमखान चांदखान पठाण (वय ६०, रा. मिल्लतनगर, श्रीरामपूर) हे रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास नमाज पठणासाठी घराबाहेर पडले असता आरोपींनी त्यांच्यावर लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केला.