esakal | पारनेर पोलिस ठाण्यातील 17 आरोपींना कोरोनाची लागण

बोलून बातमी शोधा

The 17 accused in Parner police station have been corona

एकाच वेळी पोलिस कोठडीतील 17 जाणांना कोरोनाची लागण झाल्याने पोलिस ठाण्यातील कर्मचा-यांच्या आरोग्याचाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

पारनेर पोलिस ठाण्यातील 17 आरोपींना कोरोनाची लागण
sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : पारनेर पोलिस ठाण्यात पोलिस कोठडी व न्यायालयीन कोठडीत असलेल्या 46 पैकी 17 आरोपींना कोरोनाची लागण झाली आहे. कोठडीत असलेल्या दोघांना त्रास होऊ लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने  सोमवारी (ता. 5 ) पोलिस कोठडीतील सर्वच आरोपींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी कोठडीतील आणखीन 15 जाणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

एकाच वेळी पोलिस कोठडीतील 17 जाणांना कोरोनाची लागण झाल्याने पोलिस ठाण्यातील कर्मचा-यांच्या आरोग्याचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. आरोपी व पोलीस यांचा नेहमीच संबध येत असतो. आरोपीला न्यायालयात नेणे व आणऩे, आरोपीस तपासासाठी बाहेर काढणे, तसेच पोलिस कोठडी बाहेर पहारा देणे या निमित्ताने पोलिसांचा आरोपीशी सातत्याने संबध येत असतो. त्यामुळे आता पारनेर पोलिसांच्याही आरोग्याचा व सुरक्षततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पुर्वीही गतवर्षी पारनेर पोलिस कोठडीतील आरोपींना एकाच वेळी लागण झाली होती. मुळात कोठडीत आरोपींची संख्या प्रमाणापेक्षा अधिक आहे. एकाएका बराकीत प्रमाणापेक्षा अधिक आरोपी ठेवले जात आहेत. त्यातच कोरोनाची लागण झाल्याने पोलिसांसह आरोपींच्याही सुरक्षतेचा प्रश्न या निमित्ताने  उपस्थित झाला आहे.