
नगर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे शहरालगतच्या १७ गावांमध्ये, खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदार उमेश पाटील यांनी कंटेन्मेंट झोन (टाळे) जाहीर केले.
नगर तालुक्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १३६ झाली असून, त्यांतील १०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १९ रुग्ण आतापर्यंत उपचार घेऊन घरी परतले असून, दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यापासूनच या गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब, तसेच खासगी लॅबमधील आजच्या अहवालानुसार २६ जण बाधित आढळले आहेत. त्यामध्ये बुऱ्हाणनगरचे १६, नागरदेवळे एक, टाकळी खातगाव चार, सारोळा कासार तीन यांचा समावेश आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी गावे बंद केली आहेत.
रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात, तसेच काहींना खासगी लॅबमध्ये पाठविले जाते. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने गावे संपूर्ण बंद ठेवण्यात आली आहेत. बाधित गावांशेजारील अनेक गावांनी स्वतःहून "जनता कर्फ्यू' पुकारला आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
कंटेन्मेंट झोन घोषित झालेली गावे...
घोसपुरी, गुंडेगाव, देऊळगाव सिद्धी, चास, सोनेवाडी, अकोळनेर, सारोळा कासार, नागरदेवळे, नवनागापूर, विळद, वडारवाडी, बुऱ्हाणनगर, पोखर्डी, निमगाव घाणा, टाकळी खातगाव, बाबुर्डी बेंद, रुई छत्तिशी. या गावांत अत्यावश्यक व तातडीची वैद्यकीय सेवा वगळता कोणत्याही व्यक्तीला घराबाहेर पडण्यास प्रतिबंध आहे. आरोग्य यंत्रणेतर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे-गाडे यांनी सांगितले.
संपादन - सुस्मिता वडतिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.