
शेवगाव : कत्तलीसाठी चालवलेल्या जनावरांचा टेम्पो गोरक्षक दल व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अडवून २० गायींची सुटका केली. ही कारवाई सोमवारी रात्री ११ वाजता शेवगाव-पैठण रस्त्यावर घोटण शिवारात करण्यात आली. या प्रकरणी पोलिस कर्मचारी सूरज प्रकाश भावले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.