esakal | महसुलमंत्र्याच्या कारखान्याकडून कामगारांना 20 टक्के बोनस, 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान
sakal

बोलून बातमी शोधा

20 percent bonus to workers from revenue minister factory

आर्थिक मंदी व कोरोनाच्या संकटातही सहकार महर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वांवर कार्यरत असलेल्या, भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने शेतकरी, सभासद व कामगारांना मदतीची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे.

महसुलमंत्र्याच्या कारखान्याकडून कामगारांना 20 टक्के बोनस, 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : आर्थिक मंदी व कोरोनाच्या संकटातही सहकार महर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वांवर कार्यरत असलेल्या, भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने शेतकरी, सभासद व कामगारांना मदतीची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी दिवाळीसाठी कामगारांना 20 टक्के बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

ते म्हणाले, दिवंगत भाऊसाहेब थोरात यांची आर्थिक शिस्त व आदर्श तत्वावर साखर कारखान्याची वाटचाल सुरु असून, कारखान्याने कायम शेतकरी, कष्टकरी व सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. यावर्षी कोरोनाचे संकट व आर्थिक मंदी असतानाही कारखाने एफआरपी पेक्षा जास्त भाव दिला आहे. तसेच दिवाळीनिमित्त कामगारांना 20 टक्के बोनस मधून पाच कोटी 38 लाख 75 हजार रुपये 30 दिवसांच्या सानुग्रह अनुदानातून दोन कोटी 68 लाख रुपये आणि शेतकर्‍यांच्या ठेवीचे एक कोटी 48 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच कारखान्याच्या सर्व सभासदांना 15 किलो मोफत साखरही देण्यात येणार आहे. या निमित्ताने बाजारपेठेत सुमारे 10 कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याने शेतकरी व व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले. 

यामुळे कोरोनाच्या संकटातही दिवाळी आनंदात साजरी होणार आहे. लाभार्थी कामगार व सभासदांना या निमित्त महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, इंद्रजीत थोरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींचे आभार व्यक्त केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर