
एका विधवा व अतीशय गरीब परस्थीती असलेल्या अंगणवाडी सेविकेचा मुलगा आजारी पडला त्यासाठी औषोधोपचाराचा मोठा खर्च कसाबसा केला.
पारनेर (अहमदनगर) : तालुक्यातील एका विधवा व अतीशय गरीब परस्थीती असलेल्या अंगणवाडी सेविकेचा मुलगा आजारी पडला त्यासाठी औषोधोपचाराचा मोठा खर्च कसाबसा केला. त्यातच तिचे दुर्देव तिच्या वडीलांना बैलाने मारले व खूबा मोडला त्यांच्या शस्त्रक्रीयेसाठी डॉक्टरांनी एक लाख रूपयांचा खर्च सांगीतला.
तिच्या पायाखालची वाळूच सरकली ती गर्भ गळीत झाली. मात्र तिची ही समस्या एकाने व्हॉस्अपवर मांडली अन पारनेरकारांच्या हृदयाला पाझर फुटला एका दिवसात त्या महिलेसाठी 21 हजार रूपये रोख स्वरूपात मदत जमा झाली. ती तीला दिल्यानंतर तिला अकाश ठेंगणे झाले. अजूनही मदतीचा ओघ सुरू आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील एका निराधार विधवा अंगणवाडी महिलेच्या 72 वर्षीय वयोवृद्ध वडीलांना बैलाने मारले. त्यांना शिरूर येथे एका खाजगी दवाखाण्यात दाखल केले तेथे त्या डॉक्टरांनी पायाच्या खुब्याची शस्त्रक्रीया करावी लागेल, असे सांगीतले. त्यासाठी एक लाख रूपयांचा खर्च सांगीतला. या वेळी तिच्या पायाखालची वाळूच सरकली अभाळच फाटले.
काय करावे हे सुचेना नुकताच तिच्या मुलाच्या आजारासाठी तिने होते नव्हते.
तेवढे पैसे खर्च केले होते. अता पुन्हा नव्याने वडीलांच्या शस्त्रक्रीयेसाठी एक लाखा रूपये लागणार आहेत हे ऐकूण तिच्यावर आलेल्या संकटाने ती पुरतीच गर्भगळीत झाली. त्यामुळे तीला अता काय करावे ते सुचेना. मात्र त्याच दरम्यान ही हकीगत एका सामाजिक काम करणा-या कार्यकर्त्यास समजली. त्याने ही सर्व हकीगत व्हॉटसअपवर टाकली व त्यातून मदतीचा फंडा पुढे आला. त्या महिलेसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आणि एका दिवसात 21 हजार रूपये जमा झाले व आजूनही मदतीचा ओघ सुरू आहे. तसेच एका कार्यकर्त्याने थेट उर्वरीत हॉस्पीटलाचा खर्च करण्याचे जाहीर केले.
अशा प्रकाररे व्हॉटसअपबंधूच्या माध्यामातून या अंगणवाडी सेविकेला मदतीचा मोठा अधार मिळाला आहे. सोशल मिडीयाच्या वापरावर सातत्याने टिका होत असताना अशा प्रकारे सोशल मिडीयाचा सकारात्मक उपयोग झाल्याने ही मदत देणा-यांना तसेच त्यासाठी प्रोहत्सान देणा-या सर्वांचेच तालुक्यातून अभिनंदन होत आहे. यासाठी नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के, शिवसेनेचे जिल्हाउपाध्यक्ष रामदास भोसले, मनसेचे अविनाश पवार यांनी पुढाकार घेतला होता.
संपादन : अशोक मुरुमकर