esakal | पीकविमा योजनेत भरले २३ कोटी आणि मिळाले फक्त साडेपाच कोटी; शेतकरी संभ्रमात
sakal

बोलून बातमी शोधा

crop insurance

पीकविमा योजनेत भरले २३ कोटी आणि मिळाले फक्त साडेपाच कोटी

sakal_logo
By
मुरलीधर कराळे

अहमदनगर : सरकारच्या माध्यमातून विमा कंपन्यांच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजना राबविल्या जातात. प्रधानमंत्री पीकविमा योजना, स्थानिक आपत्ती, काढणीपश्‍चात खरीप व रब्बी हंगामातील विमा योजनांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले जाते. मागील वर्षी २०२०-२१ मध्ये या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी भरलेल्या सुमारे २३ कोटी रुपयांपैकी केवळ साडेपाच कोटी जिल्ह्याला मिळू शकले. नुकसान मोठे होते. असे असताना भरपाई कमी मिळाल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत.

भरलेल्या रकमेपेक्षा भरपाई कमी

राष्ट्रीय पीकविमा योजना व प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विमा मंजूर झाला आहे. या योजनेतून खरीप व रब्बीसाठी ५ लाख ८५ हजार ७६६ शेतकऱ्यांनी विमा भरला होता. त्यासाठी ३ लाख २४ हजार ९७३.०१ हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले होते. या शेतकऱ्यांनी २२ कोटी ७५.५८ लाख रुपये विम्यापोटी भरले होते. या शेतकऱ्यांपैकी केवळ ७ हजार ४५२ शेतकऱ्यांना ५ कोटी ४४.५१ लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली. मागील वर्षी उशिरा पाऊस झाला. त्यामुळे खरिपाची पिके धोक्यात होती. रब्बीत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. त्यात वादळाने फळपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. भरलेल्या विमा रकमेपेक्षा भरपाई कमी मिळाल्याने शेतकरी संभ्रमात पडला आहे.

हेही वाचा: रामदास आठवलेंनी पिचडांच्या कानात काय सांगितले? चर्चेला उधाण

भरले १६, मिळाले २ कोटी

या योजनेबरोबरच हवामान आधारित फळपीक विमा योजना व पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या माध्यमातून मृगबहार व आंबियाबहारामध्ये डाळिंब, संत्री, पेरू, चिकू, मोसंबी, लिंबू आदी फळपिके घेण्यात आली होती. विमा योजनेंतर्गत ४६ हजार ८८५ शेतकऱ्यांनी १६ कोटी १२ लाख रुपये भरले होते. त्यातील केवळ २ हजार ७६० शेतकऱ्यांना २ कोटी ६९.६४ लाख रुपये रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे.

नव्याने भरले २१ कोटी

नवीन वर्षात म्हणजे २०२१-२२ मध्ये शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी पीकविमा योजना व प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत २ लाख ८७ हजार ९६ शेतकऱ्यांनी ११ कोटी ७८ लाख ९६ हजार रुपये भरले आहेत. तसेच फळपीक योजनेंतर्गत २० हजार २४२ शेतकऱ्यांनी ७ कोटी ४४ लाख ८२ हजार रुपये विम्यापोटी भरले आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे व्यवस्थित होऊन शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

हेही वाचा: साखर कामगारांच्या पगारवाढीचा शासनाने घेतला ऐतिहासिक निर्णय

आकडे बोलतात...

- कृषी विमा

२८७०९६ - शेतकऱ्यांनी भरला विमा

२२७५.५८ लाख - विम्यापोटी भरले

७४१२ - लाभार्थी शेतकरी

५४४.५१ लाख - मिळालेली नुकसान भरपाई

- फळपीक विमा

२०२४२ - शेतकऱ्यांनी भरला विमा

१६१२.८४ लाख - भरलेली रक्कम

२७६० - लाभार्थी शेतकरी

२६९.६४ लाख - मिळालेली नुकसान भरपाई

loading image
go to top