नगर जिल्ह्यात दिवसभरात 263 कोरोनाबाधित रुग्णांची भर

दौलत झावरे
Monday, 23 November 2020

जिल्ह्यातील 138 जणांनी रविवारी (ता. २२) कोरोनावर मात केली असून आजअखेरपर्यंत 58 हजार 571 बरे होऊन घरी परतले आहेत.

अहमदनगर : जिल्ह्यातील 138 जणांनी रविवारी (ता. २२) कोरोनावर मात केली असून आजअखेरपर्यंत 58 हजार 571 बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 95.74 इतकी होती. दिवसभरात 263 रुग्णांची भर पडलेली असून आजअखेर जिल्ह्यात 61 हजार 176 जण बाधीत झालेले आहेत. त्यातील 913 जण मृत्यूमुखी पडले आहेत. सध्या 1692 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

जिल्हा रुग्णालयाच्या तपासणी अहवालात 49 बाधीत आढळून आले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीत 32, नगर ग्रामीण दोन, नेवासे एक, पारनेर तीन, राहाता तीन, राहुरी चार, श्रीगोंदे एक व मिलिटरी हॉस्पिटल तीन रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 79 जण बाधीत आढळून आले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीत 23, अकोले पाच, कोपरगाव दोन, नगर ग्रामीण सहा, नेवासे दोन, पारनेर दोन, पाथर्डी तीन, राहाता 11, राहुरी सहा, संगमनेर 11, श्रीगोंदे दोन, श्रीरामपूर पाच, कॅंटोन्मेंटमध्ये एकजण आढळून आला आहे. अँटीजेन चाचणीत 135 जण बाधित आढळून आले आहेत.

यामध्ये, महापालिका हद्दीत आठ, अकोले दोन, जामखेड सहा, कर्जत सात, कोपरगाव 12, नेवासे 16, पारनेर तीन, पाथर्डी 20, राहाता 19, राहुरी आठ, संगमनेर आठ, शेवगाव आठ, श्रीगोंदे 13, श्रीरामपूर पाच रुग्णांचा समावेश आहे. 

जिल्ह्यातील 138 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये महापालिका हद्दीतील 24, अकोले 23, जामखेड चार, कर्जत दोन, कोपरगाव पाच, नगर ग्रामीण 25, पारनेर दोन, पाथर्डी नऊ, राहाता आठ, राहुरी दोन, संगमनेर 15, शेवगाव सहा, श्रीगोंदे पाच, श्रीरामपूर सात व कॅन्टोन्मेंटमधील एकाचा समावेश आहे. 

शहरातील आकडा वाढता 
नगर शहरात कोरोना रुग्ण आढळून येण्याचा आकडा वाढला आहे. दिवसभरात 63 रुग्ण आढळून आलेले आहेत.  

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 263 coronary artery disease patients in Nagar district during the day