सोनईमध्ये तरुण पोलिसाचा कोरोनाने घेतला बळी

सुनिल गर्जे
Tuesday, 4 August 2020

सोनई येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला एका ३२ वर्षाच्या तरुण पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे, अशी माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली.

नेवासे (अहमदनगर) : सोनई येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला एका ३२ वर्षाच्या तरुण पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे, अशी माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली. दरम्याम कोरोनाबाधित रुग्णांनी घाबरून न जाता उपचाराला समर्थपणे सामोरे जावे, असेही आवाहन त्यांनी केले.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना गेल्या आठवड्यात नेवासे फाटा येथील विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. शनिवारी (ता. 1) त्यांची प्रकृती खालवल्याने प्रशासनाने त्याला नगर येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांना नगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार दरम्यान या कर्मचाऱ्याचा सोमवारी मृत्यू झाल्याचे तालुका प्रशासनाने अधिकृतपणे जाहीर केले. पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती समजताच पोलिस कर्मचाऱ्यात खळबळ उडाली. 

दरम्यान तहसीलदार सुराणा यांनी बाधित रुग्णांनी व नागरिकांनी कोरोनाची भीती न बाळगता दक्षता घ्यावी बाधितांनी उपचाराला उत्तम प्रकारे प्रतिसाद द्यावा. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 32 year old policeman dies of corona virus in Nevasa taluka