

शिर्डी : साई समाधी मंदिरातील साईंच्या संगमरवरी मूर्तीची भविष्यात हुबेहूब प्रतिकृती तयार करता यावी. तसेच तब्बल सत्तर वर्षांपूर्वी इटालियन मार्बलमध्ये घडविण्यात आलेल्या या मूर्तीची सद्यस्थिती काय आहे, याचा अंदाज यावा, यासाठी या मूर्तीचे थ्रीडी स्कॅनिंग केले जाणार आहे.