
राहाता : प्रवरा शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने खेळांबरोबरच योग साधनेला महत्त्व दिले जाते. संस्थेच्या शाळा व महाविद्यालयांतील क्रीडा शिक्षकांनी त्यासाठी योगसाधनेचे शास्त्रशुद्ध ज्ञान आत्मसात केले. आज योगदिनानिमित्त संस्थेच्या चाळीस हजार विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी योगसाधना केली, असे प्रतिपादन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुश्मिता विखे पाटील यांनी केले.