Mahale Jewellers Robbed by Insider : मागील काही महिन्यांपासून तारण ठेवलेले दागिने सापडेनासे झाल्याने संशय बळावला. दुकानातील पाच महिन्यांचे रेकॉर्ड तपासल्यानंतर आणि सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर रोहित शिंदे याच्यावर लक्ष ठेवण्यात आले.
श्रीरामपूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील पोपट भगिरथ महाले सराफ दुकानात काम करणाऱ्या हेल्परने तब्बल चार लाख ६५ हजारांच्या सोन्याची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मॅनेजरने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.