esakal | वास्तूदुरुस्तीला पावसाचा अडथळा; जिल्हा परिषदेत दुरुस्तीसाठीचा 48 लाखांचा निधी पडूनच
sakal

बोलून बातमी शोधा

48 lakh for repairs in Nagar Zilla Parishad

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा परिषदेच्या निधीत कपात झाल्याने अनेक कामे ठप्प झाली आहे.

वास्तूदुरुस्तीला पावसाचा अडथळा; जिल्हा परिषदेत दुरुस्तीसाठीचा 48 लाखांचा निधी पडूनच

sakal_logo
By
दौलत झावरे

नगर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा परिषदेच्या निधीत कपात झाल्याने अनेक कामे ठप्प झाली आहे. निधीसाठी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या काळातच जिल्हा परिषदेच्या जुन्या वास्तूंच्या दुरुस्तीसाठी सुमारे 48 लाखांचा निधी मिळविला आहे. मात्र, निधी आल्यापासून कोरोना व पावसाचा जोर कायम असल्याने प्रत्यक्ष कामास सुरवात झालेली नाही. 

तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. यासाठी त्यांनी तत्कालिन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रेय गावडे यांना याबाबत सूचना दुरुस्तीसाठी येणाऱ्या निधीचे अंदाजपत्रक तयार करून प्रस्ताव तयार करण्यास सूचित केले होते. त्यानंतर गावडे यांनी जुन्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या 48 लाखांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे सादर केले. त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुरी मिळावी, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर व कार्यकारी अभियंता यांनी विशेष प्रयत्न केले. 

अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे 48 लाखांचा निधी दुरुस्तीसाठी मंजूर झाला आहे. हा निधी मंजूर झाल्यापासून कामात अडचणी येत आहेत. सुरवातीला कोरोनामुळे व नंतर आता पासवाचा व्यत्यय येत आहे. त्यामुळे निधी असूनही जुन्या वास्तूला गतवैभव प्राप्त करून देण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. मध्यंतरी प्रशासनाने कामास सुरवात केली होती. मात्र, पावसाचा जोर वाढल्याने प्रत्यक्ष कामास सुरवात झालेली नाही. पावसाचा जोर ओसरल्यानंतर दिवाळीनंतरच या कामास आता सुरवात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली. 

पंचायत समितीच्या जुन्या वास्तूकडे लक्ष द्या 
जिल्हा परिषदेच्या आवारातील पंचायत समितीच्या जुन्या इमारतीत अनेक समस्या आहेत. सर्व समस्यांचा सामना करीत येथील इमारतीत असलेल्या माध्यमिक शिक्षण विभाग व वेतनपथक कार्यालय आपले कामकाज नियमित करीत आहेत. 

जिल्हा परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला असून, कामास सुरवातही केली होती. मात्र, पावसामुळे हे काम सध्या बंद आहे. 
- जगन्नाथ भोर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नगर 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top