राजहंस दूधाला दिला पाच रूपये अतिरिक्त दर, संघाकडून 48 कोटी 33 लाख वर्ग

48.33 crore deposited in the bank by Rajhans Dudh Sangh
48.33 crore deposited in the bank by Rajhans Dudh Sangh

संगमनेर ः राजहंस दूध संघाने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध उत्पादक व कामगारांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी यासाठी अडचणीच्या काळात देखील दूध दर फरक व कर्मचार्‍यांना बोनस देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

2019-20 या आर्थिक वर्षात शेतकर्‍यांना राज्यात सर्वाधिक सरासरी प्रति लिटर 28 रुपये असा उच्चांकी दर दिला. तर दूध दरातील फरक, दूध पेमेंट, अनामत, वाहतूक, कर्मचारी पगार व बोनस देण्यासाठी 48 कोटी 33 लाख रुपये बँकेत वर्ग केले आहेत.

दूध संघाने चांगले दर दिल्यामुळे स्थानिक सहकारी संस्थांनी देखील दूध उत्पादकांना मोठ्या प्रमाणात दूध दर फरक दिल्याची माहिती महानंद व राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिली.
ते म्हणाले, कोरोना सारख्या महामारीत दुग्धव्यवसाय कोलमडला आहे. लॉकडाऊनमध्ये पॅकिंग दूध विक्री निम्म्यावर आली आंतरराष्ट्रीय बाजारात पावडर व बटरचे दर लक्षनियरित्या कमी झाले. या प्राप्त स्थितीमुळे दुधाचे दर कोसळले, अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला. लॉकडाऊनच्या काळात तर दूध संकलन बंद ठेवण्याची वेळ आली. मात्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली महा विकास आघाडी सरकारने महानंद मार्फत प्रतिदिन 10 लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्या नुसार एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत अतिरिक्त दूधाचे भुकटीत रूपांतर झाले. त्यामुळे शेतकर्‍यांना 25 रुपये दुध दर मिळाला.

राजहंस दूध संघाच्या 4 लाख 17 हजार लिटर दूधापैकी एक लाख लिटर दूध महानंद योजनेत समाविष्ट होत होते. या व्यतिरिक्त संघाने 1 लाख 50 हजार लिटर दुधाची 2 हजार टन दूध भुकटी स्वत:च्या दूध भुकटी प्रकल्पात बनवली. परंतु बाजारात उठाव नसल्यामुळे ही सर्व भुकटी मागणी अभावी संघाकडे शिल्लक असून, भविष्यात दूध भुकटी विदेशात निर्यात करण्याचा संघाचा मानस आहे.

असे असले तरी इतरांच्या तुलनेत प्रति लिटर पाच रुपये अधिक दर दिल्यामुळे दूध उत्पादकांना 21 कोटी अतिरिक्त रक्कम राजहंस दूध संघाने उत्पादकांना दिली असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

या व्यतिरिक्त राजहंस दूध संघाने दूध उत्पादकांसाठी दुष्काळी भागात चारा छावणी, चारा निर्मिती अभियान, दुधावरील उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी वाजवी दरात दूध उत्पादकांना औषधे मिळण्यासाठी राजहंस मेडिकल स्टोअर, अनुदानित तत्त्वावर कावीळ लसीकरण व सामूहिक गोचीड निर्मूलन, मुरघास निर्मिती, राजहंस महिला सक्षमीकरण, उच्च प्रतीचे पशुखाद्य व मिनरल मिक्स्चर यासारख्या योजना राबविल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध माध्यमातून शेतकर्‍यांना आर्थिक मदत करणे व अधिकच्या दूध दराची परंपरा कायम ठेवणे, ग्राहकांना स्वच्छ व निर्मळ दूध पुरवण्यासाठी संघाने आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी अत्याधुनिक राजहंस मिल्क शॉप राज्यभर सुरु करणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com