
संगमनेर : शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये गेल्या आठ महिन्यांमध्ये ५० ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या असून, नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागामार्फत या सर्व आगी विझविण्यात आल्या आहेत. यामुळे अग्निशमन विभागाने दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठे अनर्थही टळले आहे, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली.