
अहिल्यानगर : माळीवाडा बसस्थानक येथून लग्न समारंभाकरिता कोपरगाव येथे जात असलेल्या वृद्धाच्या खिशातील ५० हजार रुपयांची रोकड चोरट्याने गर्दीचा फायदा घेत लंपास केल्याची घटना १८ जून रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली. याबाबत दत्तात्रय मुरलीधर गावडे (वय ६०, रा. गावडेवाडी, ढवळपुरी, ता. पारनेर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.