श्रीगोंदे : येथील जिल्हा न्यायालयात आज (ता.२२) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात मोटार अपघात, भू-संपादन, कौटुंबिक वाद, दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे, तसेच ग्रामपंचायत, नगरपालिका, बँक, महावितरणची खटलापूर्वक प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये एकूण ५ हजार ६७६ प्रकरणे निकाली काढून ५ कोटी १४ लाख २२ हजार ९३० रुपयांची वसुली करण्यात आली.