
श्रीगोंदे : तालुक्यातील आनंदवाडी शिवारात दोन घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने, असा सुमारे ६ लाख १८ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी (ता.११) रात्री अडीचच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पांडुरंग दत्तात्रय खामकर (वय ६५) यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.