

अहिल्यानगर : शहरातील दैनंदिन कचरा उचलणाऱ्या ठेकेदार संस्थेला महानगरपालिकेने गेल्या सहा महिन्यांपासून पैसे दिलेले नाहीत. ठेकेदार संस्थेचे तब्बल साडेसहा कोटी रुपयांचे देयक अडले आहे. त्यामुळे या संस्थेला काम करणे कठीण झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी देखील पैसे नाहीत, त्याचा परिणाम दैनंदिन कचरा संकलनाच्या कामावर झाला असल्याचे ठेकेदार संस्थेचे म्हणणे आहे, तर ठेकेदार संस्थेचे काम असमाधानकारक असून, लवकरच ठेकेदार बदलणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.