esakal | राळेगणसिद्धीत 50 बेडचे कोविड सेंटर सुरू

बोलून बातमी शोधा

covid center

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावातील रुग्णांची उपचाराची सोय व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राळेगणसिद्धी परिवाराने सुरू केला आहे.

राळेगणसिद्धीत 50 बेडचे कोविड सेंटर सुरू
sakal_logo
By
एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली राळेगणसिद्धी परिवाराने गावातील पद्मावती मंदिर परिसरातील भक्तनिवासात 50 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावातील रुग्णांची उपचाराची सोय व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राळेगणसिद्धी परिवाराने सुरू केला आहे.

हेही वाचा: तिसगाव गटाने सामाजिक बांधिलकी जपली : कर्डिले

काही दिवसांपूर्वी राळेगणसिद्धी परिवारातील तिघांचा इतरत्र उपचार घेताना मृत्यू झाला. काही रुग्ण इतरत्र उपचार घेत आहेत. त्याची दखल घेत सरपंच डॉ. धनंजय पोटे, उपायुक्त डॉ. गणेश पोटे, उद्योजक सुरेश पठारे, माजी सरपंच जयसिंग मापारी, माजी उपसरपंच लाभेष औटी, उपाध्यक्ष दादा पठारे, ग्रामसेवक राजेंद्र कंदलकर, माजी सैनिक दादा पठारे, शरद मापारी, विठ्ठल गाजरे, सुनील हजारे, सदाशिव पठारे, विजय यादव, प्रवीण फटांगडे, सागर हजारे तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी या कामी पुढाकार घेतला. कोविड सेंटरमध्ये डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोरोनाचे सौम्य लक्षणे दिसल्यास घरी न थांबता कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन सरपंच डॉ. धनंजय पोटे यांनी केले आहे.