
अहिल्यानगर : शहरातील पतंग व मांजा विक्रेत्यांना महानगरपालिका प्रशासनाने प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. नायलॉन मांजाची विक्री करू नये, कायद्याचे पालन करावे, असे या नोटिसीमध्ये म्हटले आहे. तोफखाना, बागडपट्टी यासह शहरातील विविध भागात पतंग व मांजा विक्री करणाऱ्यांना या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.