esakal | कॉम्प्लेक्सवरुन खाली पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; श्रीरामपूर येथील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

कॉम्प्लेक्सवरुन खाली पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

हा प्रकार समजताच परिसरातील नागरिकांसह माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अभिजित याला रुग्णालय दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकासाठी संपर्क केला.

कॉम्प्लेक्सवरुन खाली पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील मेनरोड (Main road) समोरील एका कॉम्प्लेक्सच्या (complex) चौथ्या मजल्यावरुन (४० फुट उंचीवरुन) खाली पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू (died) झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. (A youth has died after falling from a complex at Shrirampur)

अभिजीत दिपक सुखदरे (वय २५) त्याचे नाव आहेत. मेनरोड समोरील साई सुपर मार्केट कॉम्प्लेक्सच्या मोकळ्या जागेत सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तो आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लागू केलेल्या लाॅकडाऊनमुळे पोलिस शहरात गस्त घालताना क्रिकेट खेळत असलेल्या तरुणांना खेळ बंद करण्याच्या सुचना पोलिसांनी केल्या.

हेही वाचा: गोड-धोड पंगतीशिवायच ऊसतोडणी कामगार माघारी

त्यावेळी पोलिसांच्या धास्तीने काही तरुण खेळ मोडून पळाले. तर अभिजित हा साई सुपर मार्केट कॉम्प्लेक्सच्या जिन्याने चौथ्या मजल्यावर गेला. तेव्हा त्याचा पात्राच्या कठडावरुन तोल गेल्याने तो कॉम्प्लेक्सवरुन (४० फुट उंचीवरुन) पत्र्यासह खाली पडला. त्यात गंभीर जखमी होवून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तर पोलीसांपासून प्रयत्नात नहाग आपल्या भावाचा बळी गेल्याचा आरोप सुजीत सुखदरे यांनी केला आहे.

हा प्रकार समजताच परिसरातील नागरिकांसह माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अभिजित याला रुग्णालय दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकासाठी संपर्क केला. अर्धा तासाने पोहचलेल्या रुग्णवाहिकेतुन त्याला शहरातील कामगार रुग्णालय दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डाॅ. रविंद्र जगधने यांनी तपासणी करून मृत असल्याचे घोषित केले. शहरातील विविध सार्वजनिक कार्यक्रमात अभिजीत याचा नेहमी सहभाग असल्याने या घटनेमुळे शहरात सर्वत्र शोक व्यक्त होत आहेत.

(A youth has died after falling from a complex at Shrirampur)