आधार कार्डमध्ये दुरुस्ती करणे झालं सोपे; सगळ्यांजवळ असणाऱ्या ‘या’ कागदपत्रांवर होणार दुरुस्ती

अशोक मुरुमकर
Saturday, 5 September 2020

आधार कार्डमध्ये एखादी चुक झाली तर अनेकदा त्यातील दुरुस्ती करताना वैताग येतो. त्यासाठी काय कागदपत्रे लागणार, किती दिवस लागणार असे एक ना अनेक प्रश्‍न पडतात.

अहमदनगर : आधार कार्डमध्ये एखादी चुक झाली तर अनेकदा त्यातील दुरुस्ती करताना वैताग येतो. त्यासाठी काय कागदपत्रे लागणार, किती दिवस लागणार असे एक ना अनेक प्रश्‍न पडतात. काही वेळा आधार कार्डवरील पत्ता देखील बदलायचा असतो. यासाठी UIDA ने काही कागदपत्रे ठरवून दिलेली आहेत. त्यानुसार पत्ता बदलता येतो. त्यात आता बँक पासबुकचीही भर पडली आहे. त्याबाबत काही सूचना ‘आधार’ने दिल्या आहेत.

आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDA) आधार कार्ड धारकांसाठी वेगवेगळ्या सुविधा देते. युआयडीए फक्त ‘आधार’ कार्डमधील दुरुस्ती करण्यास परवानगी देते. त्यासाठी काही कागदपत्रे आवश्‍य असतात. आधारमध्ये पत्ता बदलायचा असेल किंवा नावात किंवा जन्म तारिख बदलायची असेल तर त्यासाठी काही कागदपत्रे देणे आवश्‍यक असते. त्यासाठी ४४ कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्रे देणे बंधनकारक असते. 

आधारमध्ये पत्ता बदलण्यासाठी यूआयडीएने दिलेल्या ४४ कागदपत्रांपैकी बँक पासबुक एक आहे. मात्र बँक दाखवून पत्ता बदलायचा असेल तर त्यावर फोटो आवश्यक असून त्यावर बँक अधिकाऱ्यांची सही आवश्‍यक आहे.

याबाबत ‘आधार’ने ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, आधारमध्ये अ‍ॅड्रेस अपडेटसाठी बँक पासबुक वापरत आहात? तर पासबुकमधील आपल्या फोटोवर शिक्का आणि बँक अधिकाऱ्याची सही आहे का याची खात्री करा. याशिवाय हे वैध कागदपत्र मानले जात नाही. पत्त्याचा पुरावा म्हणून यूआयडीएआय इतर 44 कागदपत्रेही स्वीकारतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aadhar card correction will also be done on bank passbook

Tags
टॉपिकस
Topic Tags: