निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारली, आता घ्या नोटीस

गौरव साळुंके
Monday, 11 January 2021

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली असून, मतदान अधिकारी व कर्मचारी यांना नुकतेच प्रशिक्षण दिले.

श्रीरामपूर ः तालुक्‍यातील 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान अधिकारी आणि निवडणूक कर्मचारी यांना नुकतेच प्रशिक्षण घेण्यात आले. मतदान केंद्रावर प्रत्येकी एक मतदान केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी पाच तसेच एक शिपाई, असे एकूण 850 निवडणूक कर्मचारी नियुक्त केले आहे.

प्रथम टप्प्यातील प्रशिक्षणाला 15 केंद्राध्यक्ष, 27 सहायक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 50 तर 31 शिपाई अशा 123 निवडणूक कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याने त्यांना नोटिसा पाठविल्या आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली असून, मतदान अधिकारी व कर्मचारी यांना नुकतेच प्रशिक्षण दिले. प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळण्यासाठी प्रत्यक्षपणे दररोज तहसील कार्यालयात उपलब्ध करून दिले आहे.

15 जानेवारी रोजी तालुक्‍यातील 130 मतदान केंद्रावर मतदान होत असून, त्यासाठी येथील खासदार गोविंदराव आदिक सांस्कृतिक सभागृहात प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. 

या वेळी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी निवडणूक कर्मचारी वर्गाला मार्गदर्शक सूचना दिल्या. याप्रसंगी नायब तहसीलदार दीपक गोवर्धने, अशोक उगले यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र भगत, पुरुषोत्तम चौधरी, श्रीधर बेलसरे यांनी मार्गदर्शन केले.

दरम्यान, बेलापूर बुद्रुक येथील ग्रामपंचायत तालुक्‍यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत असून, सुमारे 14 हजारहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. तसेच टाकळीभान, बेलापूर खुर्द, पढेगाव, निपाणी वडगाव, वडाळा महादेव परिसरात प्रचाराला वेग आला आहे. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Absence from election training, take notice now