पर्यटनासाठी आलेल्या कारला अपघात; चौघांवर गुन्हा दाखल

शांताराम काळे
Monday, 13 July 2020

श्रीरामपूर, राहुरी येथून भंडारदरा पर्यटनासाठी आलेल्या चौघांचा जामगाव शिवारात अपघात झाला. पोलिसांच्या कचाट्यात सापडून स्वतः वर गुन्हा दाखल करून घ्यावा लागला. शांततेचा भंगप्रकरणी राजूर पोलिसांनी कारवाई केली.

अकोले (अहमदनगर) : श्रीरामपूर, राहुरी येथून भंडारदरा पर्यटनासाठी आलेल्या चौघांचा जामगाव शिवारात अपघात झाला. पोलिसांच्या कचाट्यात सापडून स्वतः वर गुन्हा दाखल करून घ्यावा लागला. शांततेचा भंगप्रकरणी राजूर पोलिसांनी कारवाई केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील भंडारदऱ्याकडे निघालेल्या तरुणांची गाडी अकोले तालुक्यातील जामगाव येथे पुलाखाली उतरली आणि मोठा अपघात होता होता बचावले. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झालेली नसली तरी सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी पर्यटनाला या तरुणांवर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रविवारी विवेक हेमंत जाधव (२१), अक्षय प्रकाश कुऱ्हाडे (२४), अजय देवराम गिते (२५),सर्व राहणार देवळाली प्रवरा (राहुरी) आणि अक्षय दिलीप मांजरे (वय २१, रा. भोकर, श्रीरामपूर) हे चौघे कारमध्ये बसून भंडारदऱ्याकडे चालले होते. जामगाव जवळील एका वळणावर चालकाचा गाडी ताबा सुटला आणि गाडी पुलाखाली गेली. गाडीचे चारही चाके पुलाखाली गेली मात्र नशीब बलवत्तर म्हणून गाडीचा मागचा भाग पुलाच्या कठड्याला अडकला आणि मोठा अपघात होता होता ते तरुण बचावले. अन्यथा ही गाडी पुलाखाली सुमारे पंधरा फूट खोलीच्या खडकावर आपटली असती. माहिती मिळताच राजूर पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार भडकवार घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या तरुणांवर राजूर पोलिस ठाण्यात कलम ११२,११७ अन्ववे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident to a car coming for tourism in Akole taluka