
पारनेर : अहिल्यानगर-पुणे महामार्गावर मंगळवारी सुपेनजीक पवारवाडीजवळ कंटेनर रस्त्यावर आडवा झाला. यात कंटेनर एका बाजूला व ट्रक दुसऱ्या बाजूला गेला. यात दोन जण जखमी झाले. मात्र, सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र, महामार्गावरील वाहतूक चार तासांहून अधिक काळ खोळंबली होती.