पखवाज्या पोलिस दिसताच भरकीर्तनातून पळाला... असा काय केला होता त्याने तमाशा

Accused arrested after seven years
Accused arrested after seven years
Updated on

नगर : संगमनेर तालुक्‍यातील डोंगरपट्ट्यातील छोटंसं गाव. तेथे एकजण कीर्तनातील पखवाज्या होता. एका कीर्तनात पखवाज वाजविताना त्याला पोलिस आल्याची कुणकुण लागली. भर कीर्तनातूनच त्याने धूम ठोकली. तब्बल सात वर्षे पोलिसांना गुंगारा देत तो विदर्भ- मराठवाड्यात भटकत राहिला. हॉटेलवर वेटर म्हणून काम केले. कोरोनामुळे हॉटेल बंद झाल्याने घरी आला आणि अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. असं काय केला होता गंभीर गुन्हा त्याने

अधिक माहिती अशी : संगमनेर तालुक्‍यातील शेंगाळवाडी हे छोटेसे गाव. गावात आरोपीच्याच घरात टीव्ही होता. त्यामुळे सर्व लहान मुले त्याच्या घरी टीव्ही पाहायला येत. इतर मुले टीव्ही पाहत असताना, घरमालक आरोपीचा नात्यातीलच 14 वर्षांच्या शाळकरी मुलीवर डोळा होता. तिला तो चॉकलेट खायला देत असे, तसेच शाळेतही सोडत असे. तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्याने मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तब्बल सहा महिने तो वारंवार तिच्यावर अत्याचार करीत राहिला. अखेर ही बाब गावभर झाली. मुलीच्या घरच्यांनी त्याच्याविरुद्ध घारगाव पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आरोपी कीर्तनात पखवाज वाजवीत असे. परिसरातील गावांमध्ये सप्ताहात पखवाज वाजविण्यासाठी तो जात असे. एक दिवस अणे (ता. जुन्नर) येथे सप्ताहातील कीर्तनात पखवाज वाजवीत असताना, तेथे पोलिस आल्याची कुणकुण त्याला लागली. स्वत:ची दुचाकी तेथेच टाकून त्याने पळ काढला. काही दिवस तो उंचखडक (ता. अकोले) येथे राहिला. तेथून कळसूबाई येथे गेला. पुढे त्र्यंबकेश्‍वरला काही दिवस राहिला. नंतर विदर्भात गेला. नागपूर, नांदेड, अमरावती येथील काही हॉटेलांवर वेटर म्हणून काम केले.

घराकडे तो सात वर्षे फिरकलाही नाही. कोणाशीही संपर्क केला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला फरार घोषित केले होते. 
कोरोनामुळे देशात लॉकडाउन झाल्याने सर्व हॉटेले बंद झाली. हॉटेलमालकाने आरोपीला घरी जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, दीड महिन्यापूर्वी तो गावाकडे परतला. मात्र, घराबाहेर पडत नव्हता. एके रात्री तो घराबाहेर पडला. ते कुणीतरी पाहिले नि पोलिसांना खबर केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com